1) प्रस्तावना 2) वाघ माझ्या कॅमेऱ्यातून 3) लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट 4) ऑफबीट 5) मी आणि माझी फोटोग्राफी 6) अ‍ॅमराल्ड ग्रीन 7) जत्रा 8) मुलाखत - सिया खारकर, लॉस एंजेलिस 9) हा छंद जीवाला लावी पिसे 10) मुलाखत - आर्थर मोरीस, फ्लोरिडा 11) इस्तंबूल - एक झलक 12) पहिला धडा 13) जंगलातले दिवस..... 14) स्पोर्ट्स फोटोग्राफी 15) मुलाखत - गोपाळ बोधे, मुंबई 15A) गोपाळ बोधे - स्लाईड शो 16) माझी टेबलटाप फोटोगीरी 17) गा विहगांनो माझ्यासंगे! 18) कशी नशिबाने थट्टा मांडली 19) 'रेघोट्या' 20) शिरीष कराळे - स्लाईड शो 21) केरळ - एक अनोखी संस्कृती 22) प्र.चित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून 23) पक्षी निरीक्षण 24) पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे 25) प्रकाशचित्रणाचा छंद 26) पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर © Copyrights. All Rights Resrevedसंपादकांच्या लेखणीतून

गेली सोळा वर्षे नवनवीन कल्पना मांडणे, त्याची विचारपूर्वक सर्वांच्या संमतीने बैठक पक्की करणे आणि सर्व सभासदांच्या सहकार्याने त्या कल्पना प्रत्यक्ष वास्तवात आणण्याची फोटो सर्कल सोसायटीची परंपरा आहे.

दर महिन्याच्या तिस-या रविवारी सुरु असणारे मान्यवरांचे स्लाईड शो किंवा कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या प्रकाशचित्रणाच्या कार्यशाळा आणि प्रदर्शन, दर महिन्याची सभासदांसाठी असलेली ऑन-लाईन स्पर्धा, संस्थेची अभिमानास्पद अशी बावन्न महिला सदस्य संख्या आणि त्यातीलच काही महिला सदस्यांनी प्रकाशचित्रण केलेले विद्युल्लता हे 'जागतिक महिला दिना' निमित्त आयोजित केलेले प्रदर्शन, अथवा सलग पंधरा वर्षे सातत्याने प्रसिध्दीचा चढता क्रम असलेली अविष्कार ही स्पर्धा व प्रदर्शन, या आणि अशा अनेक उपक्रमांचा वानगीदाखल उल्लेख करता येईल.

संपूर्णपणे प्रकाशचित्रणाला वाहिलेला पहिला ऑन-लाईन मराठी दिवाळी अंक प्रकाशित करणे हे फोटो सर्कल सोसायटीचे स्वप्न गतसाली प्रत्यक्षात आले. अनेक सभासदांच्या अथक प्रयत्नाने हे शिवधनुष्य फोटो सर्कल सोसायटीने पेलले. त्या दिवाळी अंकाने फोटो सर्कल सोसायटीला एक आयाम दिला. सामाजिक आणि थोडेफार आर्थिक स्थैर्य दिले. सुमारे सहा हजार प्रकाशचित्रप्रेमींनी हा दिवाळी अंक डाऊनलोड केला आणि त्यापेक्षा जास्त संख्येने त्यांच्या कुटुंबियांनी त्याचा आनंद लुटला. यावर्षी अधिक रेखीव व तांत्रिकदृष्ट्या अधिक सफाईदार अंक तुमच्या भेटीला येत आहे.

अनेक वर्ष जंगलात असणारा वन्यजीव अभ्यासक चंद्रपूरचा अतुल धामणकर, भारतातली पहिली महिला वन्यजीव-प्रकाशचित्रकार दिल्लीची रतिका रामसामी, अकोल्याचा नीरज भांगे, नाशिकचा मिलिंद देशमुख, आंतरराष्ट्रीय खेळांचे प्रकाशचित्रण करणारा इंद्रनील मुखर्जी, सुप्रसिध्द हवाई प्रकाशचित्रकार गोपाळ बोधे, किटकांचा अभ्यासक करणारे युवराज गुर्जर, शिरीष कारळे, गिरीष वझे, संस्थेच्या विधी सल्लागार ऍङ माधवी नाईक, निलेश भांगे, प्रा. गजानन देवधर या मान्यवरांसोबत संस्थेचे सदस्य स्वप्नाली मठकर, मेघना शहा, रेखा भिवंडीकर, संघमित्रा बेंडखळे, सतेजा राजवाडे, वेदवती पडवळ, नील नाईक आणि सार्थक आव्हाड यांचा सहभाग आहे.

या वर्षीच्या अंकात अभिमानाने उल्लेख करावा असे काही प्रकाशचित्रकार आपल्या भेटीला येत आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत निर्भय पाटील, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता व पुरस्कार मिळवलेले दिल्लीचे अनुप नेगी, लॉस ऐंजलीसच्या (अमेरीका) सिया खारकर आणि सुप्रसिध्द वन्यजीव प्रकाशचित्रकार फ्लोरीडाचे (अमेरीका) ऑर्थर मॉरीस यांच्या लेखांचा अंकातला सहभाग म्हणजे फोटो सर्कल सोसायटीच्या शिरपेचातील एक मानाचा तुरा म्हणावे लागेल.

या सर्वांच्या आभारासह माझ्या सोबत अथक परिश्रम घेणारे स्वफ्नाली मठकर, संजय जाधव व या उपक्रमासाठी पूर्णपणे मोकळीक देणारे संस्थेचे अध्यक्ष प्रवीण देशपांडे आणि फोटो सर्कल सोसायटीचे सर्व पदाधिकारी, सदस्य व जाहिरातदार यांच्या उल्लेखाशिवाय हे संपादकीय अपूर्ण राहील....

धन्यवाद!
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.....!


मागील लेख पुढील लेख